केम प्रतिनिधी
:- श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम मधील शैक्षणिक वर्ष २०२४/०२५ – राष्ट्रीय स्तरावरील NMMS स्कॉलरशिप धारक तसेच सारथी स्कॉलरशिप धारक आणि NMMS उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर,उपाध्यक्ष गणेश तळेकर,शालेय व्यवस्थापन सदस्य विजयकुमार तळेकर श्री धनंजय ताकमोगे,सेवानिवृत्त मेजर श्री रघुनाथ तळेकर उपस्थित होते. NMMS राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीधारक कु.करुणा विठ्ठल लेंडे,कु.उज्वल विजयकुमार तळेकर,या विद्यार्थ्यांचा आणि श्री विठ्ठल लेंडे,श्री विजय तळेकर,श्री धनंजय ताकमोगे,श्री वैभव कोकाटे, या पालकांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक एम.डी बेले सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर,यांच्या हस्ते करण्यात आला.NMMS सारथी स्कॉलरशिप धारक विद्यार्थी कु.गार्गी वसंत तळेकर,कु.अनुष्का प्रशांत तळेकर,कु.कार्तिकी वैभव कोकाटे,कु.सोनाक्षी धनंजय ताकमोगे,विद्यार्थ्यांचा आणि उपस्थित श्री वसंत तळेकर (शा.व्य समिती अध्यक्ष)पालकांचा प्रशालेचे मुख्याध्यापक एम.डी बेले सर,पर्यवेक्षक गिते सर ज्येष्ठ शिक्षक सांगवे सर,श्री कुंभार सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर,उपाध्यक्ष गणेश तळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.NMMS उत्तीर्ण विद्यार्थी विरधवल शेखर गाडे, समर्थ दादा पालवे,कु.समृध्दि दिलीप गुळवे,कु.आलिया सरफराज मोमीन,कु.अनुष्का राजकुमार होरणे,कु.सृष्टि विष्णू देवकर,कु.साक्षी बापुराव वेदपाठक या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.NMMS शिकवणारे मार्गदर्शक शिक्षक(NMMS प्रमुख) श्री एम.एम पोतदार सर,श्री बी.व्ही सांगावे सर,श्री टि.व्ही पवार सर,श्री हिरवे सर यांचा गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाद्वारे व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सामाजिक शास्त्रे विषयात सोलापूर जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक आणि तालुकास्तरीय प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणारे श्री जी.के जाधव सर यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष गणेश तळेकर,प्रशालेचे मुख्याध्यापक एम.डी बेले सर यांच्या हस्ते करण्यात आला.श्री जी.के जाधव सर यांनी पुरस्कारातील 11000 रु /-(अकरा हजार रू/- )रक्कम शाळेला विविध कामासाठी देण्याचे जाहीर केले.व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत विज्ञान विषयात तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक श्री एम.एम पोतदार यांनी मिळावल्याबद्दल त्यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष गणेश तळेकर,प्रशालेचे मुख्याध्यापक एम.डी बेले सर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वाघमारे सर यानी मानले
























