समाजातील सर्व लोकांचा सामावेश करून घेणारा व परिवर्तनाच्या वाटेवरचा महाराष्ट्रात चर्चेत असलेला आगळा वेगळा हरिणाम सप्ताह
काल गौडरे येथे संपन्न झाला. श्रीराम नवमी ते हनुमान जयंती या कालावधीत मौजे गौंडरे ता.करमाळा अखंड हरिनाम सप्ताहमध्ये किर्तनाव्यतिरीक्त काळाची गरज असणाऱ्या विविध उपक्रमांनी संपन्न झाला.याचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रभर दिसून येत आहे.
दि .6 एप्रिल 2025 ते 12 एप्रिल 2025 या कालावधीत हरिनाम सप्ताह संपन्न झाला. सप्ताह मंडपमध्ये थोर संत महापुरुषांचे सुविचार लावण्यात आले होते.अगदी गौतम बुद्धापासून ते अंतरराळावरील सुनीता विल्यम्स पर्यंतच्या संत महापुरुषांचे सुविचार सातही दिवस दिसून आले.संपूर्ण सात दिवस शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.त्यामध्ये संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,गायन स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा बौद्धिक खेळ ,आणि वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून यशस्वी विद्यार्थ्यांना योग्य ती पारितोषिक वाटप करण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थांच्या कलागुणांना वाव यातून मिळाला .संत महापुरुषांचे चांगले विचार मुलांनी आत्मसात केले . वसुंधरा परिवार महाराष्ट्र राज्य गौंडरे गेली कित्येक वर्षापासून अनेक भारतीय वृक्षांचे संवर्धन करीत आहे. या सप्ताह मध्ये आलेल्या कलाकारांना तसेच कीर्तनकारांना शाल श्रीफळ फेटा न देता वृक्ष दिला गेला.
गावातून सासरी गेलेली लेक व गावात आलेल्या सुनेसाठी एक झाड प्रत्येक वर्षी असा उपक्रम राबवून पर्यावरणाचे संवर्धन करण्यात येते. तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम घेतले . सर्व समाजातील लोकांना सहभागी करून घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचे काम या सप्ताहमधून दिसून आले.11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी केली .वारकरी व्यासपीठावर महात्मा फुले यांची जयंती साजरी करणारा हा पहिला सप्ताह असेल ! पर्यावरण वाचवा विषमुक्त शेती, राष्ट्रीय एकात्मता, शिक्षण, संत विचार व सध्याची परिस्थीती, स्वच्छ गाव अशा अनेक विषयावर प्रबोधन झाले. प्रा. राखसर यांनी पाणी फाउंडेशनचे विचार घेवून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील विद्यार्थ्यांनी देखील येवून आपली कला सादर केली .शेवटच्या दिवशी शोभायात्रा काढली गेली . यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आनले .यातून राष्ट्रीय एकात्मता दिसून आली.श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कृषी शीबीर,आरोग्य शिबीर, शालेय स्पर्धा. पर्यावरण वाचवा जनजागृती, महापुरुषांच्या विचारांचा जागर यामधून समाज परिवर्तन होऊन समाजात सुख शांती नांदावी . सामाजिक सलोखा जपावा यासाठी सात दिवस सर्व ग्रामस्थांनी व परगावाहूनही अनेकाने अन्नदान केले. सर्वांनी सहभागी होउन कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.