दरवर्षी प्रमाणे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती कडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती केम येथील मेन चौकामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमतः महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीमे पुढे नतमस्तक होऊन पंचशीले द्वारे महामानवाची पुजा केण्यात आली.पूजा संपन्न झाल्या नंतर काही छोट्या भीम सैनिकांनी बाबासाहेबांचे विचार चिमुकल्या भाषेत पण परखड पणे मांडले.
महामानावाची पूजा संपन्न होत असताना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती मधील सर्व सदस्य व केम मधील सर्व नामधारी प्रतिष्ठीत नागरिक आणि पूर्ण व्यापारी वार्ग अभिवादन करण्यासाठी आपली उपस्थित दर्शवली.जयंती उत्सव समितीचे सदस्य अभिव्यक्ती NEWS च्या प्रतिनिधीशी बोलत असताना त्यांच्या कडून असे सांगण्यात आले की महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आमच्या साठी एक दिवसीय नसून ती आमच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यातून पुर्ण वर्षभर साजरी करु आणि 14 एप्रील हा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आनंदाचा दिवस आहे! असे सांगण्यात आले. या वेळेस महामानवाला अभिवादन करण्यासाठी मा.पंचायत समिती सभापती शेखर(तात्या)गाडे,मा.सरपंच अजित (दादा) तळेकर, विद्यमान सरपंच राहुल (आबा) कोरे,उप सरपंच सागर कुर्डे, मा.उप सरपंच सुलतान मुलानी, प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष बापू (नेते) तळेकर, प्रहार संघटना ता.अध्यक्ष संदीप तळेकर, प्रहार संघटना संपर्क प्रमुख सागर पवार,बळीराम ओहोळ, प्रमोद मखरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष आनंद ओहोळ, उपाध्यक्ष प्रथमेश देडगे, प्रविण मखरे,शुभम गाडे,संदीप कांबळे,रमेश मखरे, अतुल गायकवाड,प्रशांत मखरे, दशरथ पवार, संतोष गायकवाड, भालचंद्र गाडे,मधुकर ओहोळ, तानाजी पोळके,राजेंद्र कांबळे,प्रसाद गाडे किरण ओहोळ, सागर ओहोळ, प्रमोद गाडे संदीप गाडे, प्रशांत गाडे मेजर, निलेश ओहोळ, सुमित गाडे, सोहेल गाडे, लखन जगताप, निखिल साळवे, सुमित कांबळे
प्रज्वल पोळके, शिवम सरवदे, रोहित पोळके, बबलु पोळके हे सर्व उपस्थित होते.