मुंबईतील श्रम रक्षा भवन येथे नुकतीच रेल्वे युनियन कामगारांच्या मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब चव्हाण सचिव श्री . अमितजी भटनागर तसेच विनायक येसने यांच्या नेतृत्वात चीफ लेबर कमिशनर श्री. संजय डाबी यांच्याशी रेल्वे युनियन कामगाराच्या समस्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेमध्ये कामगारांच्या अनियमित वेतन, सेवाशर्ती, कंत्राटदाराकडून गैर वर्तणूक तसेच अन्य मूलभूत अडचणींचा समावेश होता. रेल्वे युनियनचे पदाधिकारी यांनी कामगाराचे प्रतिनिधींत्व करून आपली मते, अडचणी व तक्रारी स्पष्टपणे मांडल्या.
चीफ . लेबर कमिशनर संजय डाबी यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व संबंधित विभागांशी समन्वय साधत काही समस्यांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. उर्वरित प्रलंबित प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीमुळे रेल्वे युनियन कामगारांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण झाले असून, कामगार हितासाठी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे व रेल्वे युनियनचे पदाधिकारी कामगाराच्या सदैव सोबत आहेत याची खात्री त्यांना मिळाली.
भविष्यातही रेल्वे युनियन कामगारांच्या समस्या वर व प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन कामगाराचे प्रश्न सोडवण्याचा सदैव प्रयत्न केला जाईल.























