Homeताज्या बातम्याकेम येथे VK नंबर eKYC व Farmer ID मोफत शिबिरास शेतकरी बांधवांचा...

केम येथे VK नंबर eKYC व Farmer ID मोफत शिबिरास शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केम :
महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव जयंती समिती – केम आणि Makhare Online CSC Center – केम यांच्या संयुक्त विद्यमाने व समितीच्या स्वखर्चातून आयोजित करण्यात आलेल्या VK नंबर eKYC आणि Farmer ID मोफत शिबिरास केम तसेच आसपासच्या गावांमधून शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शेतकऱ्यांच्या वाढत्या गर्दीमुळे परिसरातील CSC व Aaple Sarkar केंद्रांवर मोठा ताण निर्माण होत होता. या समस्येवर तोडगा म्हणून आज विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मोफत सेवांचा लाभ – महिलांचा विक्रमी सहभाग

या शिबिरामध्ये :

VK नंबर eKYC

Farmer ID नोंदणी

‘लाडकी बहिण’ eKYC

या सर्व सेवांचा पूर्णपणे मोफत, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने लाभ देण्यात आला.
शिबिरात महिलांचा सहभाग लक्षणीय वाढला असून, बहिणींनीदेखील मोठ्या संख्येने येऊन eKYC पूर्ण केली.

मान्यवरांची भेट व मार्गदर्शन

शिबिराला खालील मान्यवरांनी भेट देत पाहणी व मार्गदर्शन केले :

श्री. शेखर (तात्या) गाडे – माजी सभापती, पंचायत समिती

राजाभाऊ आदलिंगे – कार्यतत्पर महसूल अधिकारी, केम

बप्पूसाहेब बिचितकर – चेअरमन, नूतन विद्यालय

बळासाहेब वासकर

पत्रकार प्रविण मखरे

पै. रमेश मखरे
प्रसाद गाडे
श्रीकांत ढेरे
समितीचे अध्यक्ष अनंतराव ओहोळ तसेच प्रशांत मखरे, शुभम गाडे, निलेश ओहोळ, सुमित गाडे, किरण ओहोळ, संदीप कांबळे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

विद्यालयाचे मोलाचे सहकार्य

या विशेष उपक्रमात नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम येथील मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व कर्मचाऱ्यांनी दिलेले सहकार्य उल्लेखनीय ठरले.

उपक्रमाचा प्रमुख हेतू
शेतकऱ्यांची गैरसोय कमी करणे, वाढलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि एकाच ठिकाणी मोफत, पारदर्शक व दर्जेदार सेवा उपलब्ध करणे — हा उपक्रम राबविण्याचा मुख्य उद्देश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केम रुपांतरीत साठवण तलाव प्रकरणी चौकशी न झाल्यास १२ मार्चला मंत्रालयासमोर प्रहारचे आंदोलन

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यातील केम येथील रुपांतरीत साठवण तलाव योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे....

वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ कडून शिवाजी महाराज स्मारकाला...

चिखलठाण (ता. करमाळा) — येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाला वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ यांच्या वतीने सदिच्छा...

🔴 ‘बॉस-बाजी’ जोडीची विजयी धडाकेबाज धाव; केमच्या समाधान पवारांचा श्री उत्तरेश्वर केसरी किताबावर कब्जा

केम (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत ‘बॉस-बाजी’ या दमदार बैलजोडीने मैदान गाजवत प्रथम क्रमांक पटकावला....

🚨 करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी! चोरीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना परत

करमाळा | प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा वेगवान आणि प्रभावी कारवाई करत चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीस परत दिला आहे. त्यामुळे परिसरात...

🚨 केम (ता. करमाळा) येथे महावितरण कार्यालयात बेफिकीरीचा कळस! ‘हालचाल रजिस्टर माहितीच नाही’ —...

केम (ता. करमाळा) | प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरण कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या नागरिकाला...

error: Content is protected !!